Fully Accessible Route (FAR) अंतर्गत परकीय गुंतवणूक
भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यानंतरही, परकीय गुंतवणूकदारांनी Fully Accessible Route (FAR) अंतर्गत जानेवारीपासून ₹51,730 कोटी ($6 अब्ज) पेक्षा जास्त गुंतवणूक भारतीय बाँडमध्ये केली आहे.
Fully Accessible Route (FAR) म्हणजे काय?
- FAR बाँड्स म्हणजे भारतीय सरकारी रोखे (Government Securities) जे Fully Accessible Route (FAR) अंतर्गत परकीय गुंतवणूकदारांसाठी कोणत्याही गुंतवणूक मर्यादेशिवाय उपलब्ध असतात.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मार्च 2020 मध्ये हा मार्ग सुरू केला.
- याचा उद्देश भारताच्या बाँड बाजारात परदेशी गुंतवणूक वाढवणे हा आहे.
- परदेशी नागरिकांना भारत सरकारच्या विशिष्ट दिनांकित रोख्यांमध्ये (Dated Securities) गुंतवणुकीसाठी संधी उपलब्ध करून देणे.
कोण गुंतवणूक करू शकतात?
- Foreign Portfolio Investors (FPIs) - परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार
- Non-Resident Indians (NRIs) - अनिवासी भारतीय
- Overseas Citizens of India (OCIs) - परदेशस्थ भारतीय नागरिक
- RBI द्वारे मान्यता प्राप्त इतर आंतरराष्ट्रीय संस्थात्मक गुंतवणूकदार
गुंतवणूक मर्यादा:
- पात्र गुंतवणूकदार कोणत्याही गुंतवणूक मर्यादेशिवाय भारत सरकारच्या विशिष्ट रोख्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात.
FAR चे महत्त्व
- भारताचा जागतिक वित्तीय बाजारात समावेश: हे बाँड्स भारताच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारातील एकात्मतेस चालना देतात.
- JP Morgan द्वारे मान्यता:जून 2024 मध्ये,JP Morgan ने FAR कार्यक्रमांतर्गत 29 भारतीय सरकारी बाँड्सना आपल्या लोकप्रिय Emerging Market Bond Index (EMBI) मध्ये समाविष्ट केले.
- यामुळे भारताच्या सरकारी रोख्यांमध्ये परकीय गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Subscribe Our Channel