भारत आणि इजिप्त दहशतवादविरोधी सहकार्य
भारत आणि इजिप्त यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कैरो येथे पार पडलेल्या चौथ्या दहशतवादविरोधी संयुक्त कार्यगटाच्या (4th Counter-Terrorism Joint Working Group) बैठकीत घेण्यात आला.
इजिप्त विषयी महत्त्वाची माहिती (Source: WorldAtlas)
- राजधानी: कैरो इजिप्तची राजधानी आणि सर्वात मोठे शहर
- भौगोलिक स्थान: ईशान्य आफ्रिकेत वसलेले, सायनाय द्वीपकल्पाद्वारे आग्नेय आशियात पसरलेले एक खंडांतर देश (Transcontinental Country)
- सीमा:
- पश्चिमेस: लिबिया
- दक्षिणेस: सुधान
- ईशान्येस: इस्रायल व गाझा पट्टा
- किनारा:
- उत्तरेस: भूमध्य समुद्र
- पूर्वेस: लाल समुद्र
- प्रमुख पर्वतरांगा: रेड सी हिल्स, सायनाय पर्वत
- सर्वोच्च शिखर: माउंट कॅथरिन (2,642 मीटर)
- महत्त्वाचे वाळवंट: पश्चिम वाळवंट (Al-Aṣrā al-Gharbiyyah), पूर्व वाळवंट (Al-Aṣrā al-Sharqiyyah)
- महत्त्वाची नदी: नाईल नदी जगातील सर्वात लांब नदी, दक्षिणेकडून उत्तर दिशेने वाहणारी
- शासनप्रणाली: अर्ध-राष्ट्रपती प्रणाली; (कार्यकारी सत्तेचे वितरण राष्ट्रपती व पंतप्रधानांमध्ये)
भारत-इजिप्त दहशतवादविरोधी सहकार्याचे मुद्दे
- तंत्रज्ञानाचा दहशतवादासाठी वापर आणि आर्थिक पुरवठ्याचे मार्ग, विशेषतः क्रिप्टोकरन्सी, मानवरहित हवाई प्रणाली (UAS) आणि सायबरस्पेसचा गैरवापर या नव्या आव्हानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य मजबूत करण्याचे ठरवले.
- अंमली पदार्थांचे तस्करी, मनी लॉन्डरिंग आणि संघटित गुन्हेगारी यावर संयुक्त प्रयत्न करण्यावर भर दिला.
- प्रशिक्षण, क्षमता विकास, सायबर सुरक्षा, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा दहशतवादविरोधी उपयोग, माहिती व अनुभवांची देवाणघेवाण या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय.
- संयुक्त राष्ट्रसंघ (UN), BRICS, FATF आणि Global Counter Terrorism Forum (GCTF) सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर दहशतवादविरोधी बहुपक्षीय सहकार्य बळकट करण्यावर भर.
UN Comprehensive Convention on International Terrorism (CCIT) लवकरात लवकर अंतिम करून स्वीकारण्याची दोन्ही देशांची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करण्यात आली.
Subscribe Our Channel