भारतासाठी अमेरिका द्वारे IPMDA अंतर्गत लष्करी मदतीस मंजुरी
नुकतेच, अमेरिकेने भारताला इंडो-पॅसिफिक मेरीटाइम डोमेन अवेअरनेस (IPMDA) उपक्रमाअंतर्गत लष्करी हार्डवेअर आणि लॉजिस्टिक सहाय्य पॅकेज मंजूर केले आहे.
अमेरिकेने भारतासाठी मंजूर केलेल्या मदतीचे तपशील
अमेरिकेने भारतासाठी अंदाजे 131 मिलियन डॉलर्स किंमतीची मेरीटाइम देखरेख तंत्रज्ञानाची विक्री मंजूर केली आहे. या करारात समाविष्ट आहेत:
- SeaVision सॉफ्टवेअर आणि त्यातील सुधारणा
- Technical Assistance Field Team (TAFT) मार्फत प्रशिक्षण
- सॉफ्टवेअर व विश्लेषणासाठी रिमोट सपोर्ट
- प्रोग्राम डॉके्युमेंटेशन आणि लॉजिस्टिक सहाय्य
SeaVision हे जहाज ट्रॅकिंग आणि किनारी देखरेखींसाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे साधन आहे.
इंडो-पॅसिफिक मेरीटाइम डोमेन अवेअरनेस (IPMDA) विषयी माहिती
- IPMDA हा क्वाड (Quad) देशांचा संयुक्त उपक्रम असून, मे 2022 मध्ये टोकियोमध्ये पार पडलेल्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती.
- या उपक्रमाचा उद्देश "डार्क शिपिंग" म्हणजेच ट्रॅकिंग सिस्टीम बंद करून निरीक्षण टाळणाऱ्या
- जहाजांवर लक्ष ठेवणे आणि इंडो-पॅसिफिक महासागरी क्षेत्रात जलद, व्यापक आणि अचूक देखरेख प्रणाली विकसित करणे हा आहे.
IPMDA अंतर्गत लक्ष्यित क्षेत्रे
या उपक्रमांतर्गत तीन प्रमुख भौगोलिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाते:
- पॅसिफिक आयलंड्स
- आग्नेय आशिया
- भारतीय महासागर क्षेत्र (Indian Ocean Region - IOR)
IPMDA चे उद्दिष्ट आणि कार्य
- IPMDA चे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे इंडो-पॅसिफिक भागातील सागरी मार्गांवरील पारदर्शकता वाढवणे आणि मेरीटाइम डोमेन अवेअरनेस मजबूत करणे.
- या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, जसे की व्यावसायिक उपग्रह रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) डेटाचा वापर करून सागरी हालचालींचे जवळपास रिअल-टाइममध्ये निरीक्षण करता येते.
- IPMDA द्वारे आग्नेय आशिया, पॅसिफिक आणि भारतीय महासागरातील भागीदार देशांना त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये (EEZs) अचूक आणि वेळेवर सागरी गुप्त माहिती मिळवून संरक्षण साधता येते.
महत्त्व आणि परिणाम
- या उपक्रमामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना "डार्क शिपिंग", मानवी संकटे इत्यादी समस्यांवर त्वरित प्रतिसाद देता येईल. (डार्क शिप्स म्हणजे अशी जहाजे जी स्वतःच्या Automatic Identification System (AIS) ट्रान्सपोंडरला बंद करतात, जेणेकरून ती निरीक्षणातून सुटू शकतील.)
- ही प्रणाली क्षेत्रीय सुरक्षितता वाढवते, समुद्री व्यापार आणि EEZs चा संरक्षण सुनिश्चित करते, तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करते.
Subscribe Our Channel