आंतरराष्ट्रीय बुकर 2025 : ‘Heart Lamp’ ला सर्वोच्च सन्मान
अलीकडील घडामोडीत, कन्नड साहित्यातील नामवंत लेखिका बनू मुश्ताक यांनी लिहिलेल्या Heart Lamp या लघुकथासंग्रहाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 हा जगप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आला. हे पुस्तक दीपा भास्ती यांनी कन्नडहून इंग्रजीमध्ये अनुवादित केले आहे.
विशेष म्हणजे, Heart Lamp हे या पुरस्काराचा मान मिळवणारे पहिले लघुकथांचे संकलन ठरले असून, यामुळे जागतिक साहित्यविश्वातही एक नवे पर्व सुरू झाले आहे.
भाषांतर व मूळ भाषा:
- हे पुस्तक मूळतः कन्नड भाषेत लिहिले गेले आहे.
- त्याचे इंग्रजीत भाषांतर दीपा भास्ती (मडिकेरी येथील अनुवादिका) यांनी केले आहे.
लेखिकेबद्दल बद्दल माहिती:
- बनू मुश्ताक या वकील आणि पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.
- त्या एक प्रख्यात कथालेखिका, कवयित्री, कादंबरीकार आणि सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत.
पुरस्कार समारंभ:
- हा पुरस्कार लंडनमधील टेट मॉडर्न (Tate Modern) येथे झालेल्या समारंभात जाहीर करण्यात आला.
न्यायमंडळ व अध्यक्ष:
- 2025 च्या पुरस्कारासाठीचे न्यायमंडळ सुप्रसिद्ध लेखक मॅक्स पोर्टर यांच्या अध्यक्षतेखाली होते.
- Heart Lamp हे पहिले लघुकथांचे संकलन आहे ज्याला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.
न्यायमंडळाची प्रतिक्रिया (मॅक्स पोर्टर यांच्या शब्दांत):
- "Heart Lamp हे इंग्रजी वाचकांसाठी खरोखरच नवीन काहीतरी आहे."
- "हे एक क्रांतिकारी भाषांतर आहे जे भाषेला अस्वस्थ करत नव्या पोतांची निर्मिती करते आणि इंग्रजीतील बहुवचनीतेचे दर्शन घडवते."
- "हे अनुवादाच्या समजुतीला आव्हान देते आणि ती विस्तृत करते."
इंटरनॅशनल बुकर पुरस्काराची माहिती:
- स्थापना आणि उद्दिष्ट:
- इंटरनॅशनल बुकर पुरस्कार (पूर्वीचा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार) हा एक आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे.
- जून 2004 मध्ये मॅन बुकर पुरस्काराच्या (आताचा बुकर पुरस्कार) पूर्ततेसाठी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
- 2005–2015 कालावधी:
- मॅन ग्रुपच्या प्रायोजकत्वाखाली हा पुरस्कार दर दोन वर्षांनी दिला जात असे.
- कोणत्याही राष्ट्रीयतेच्या जीवित लेखकाला इंग्रजीत किंवा इंग्रजीत अनुवादित त्यांच्या एकूण साहित्यिक कार्यासाठी दिला जात असे.
- पुरस्कार लेखकाच्या संपूर्ण योगदानासाठी होता, एखाद्या विशिष्ट पुस्तकासाठी नव्हे.
- 2016 पासून बदल:
- 2016 पासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
- इंग्रजीत अनुवादित आणि यु.के. किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या एकल कादंबरी/कथासंग्रहासाठी दिला जातो.
- £50,000 इतकी पारितोषिक रक्कम लेखक आणि अनुवादक यांच्यात समान वाटली जाते.
- क्रँकस्टार्टचे प्रायोजकत्व (2019 पासून):
- 1 जून 2019 पासून सर मायकेल मोरिट्झ आणि हॅरियेट हेमन यांच्या "क्रँकस्टार्ट" संस्थेने बुकर पुरस्कारांना आर्थिक पाठबळ दिले.
- त्यानंतर पुरस्कारांचे नाव "द बुकर प्राइज" आणि "द इंटरनॅशनल बुकर प्राइज" असे झाले.
- प्रेरणा व विधान:
- मोरिट्झ यांनी सांगितले की: "आमच्यासाठी असा एकही दिवस नाही ज्या दिवशी आम्ही पुस्तक वाचत नाही. बुकर पुरस्कार हे उत्तम साहित्याचे आनंद व विचारसंपन्नता जगापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम आहेत."

Subscribe Our Channel