कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश

Home / Blog / कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश
छत्तीसगड राज्याच्या बस्तर जिल्ह्यात जगदलपूर येथे वसलेले कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे जैवविविधतेने समृद्ध असे वनक्षेत्र आहे. युनेस्कोने ‘नैसर्गिक’ श्रेणीत या उद्यानाचा जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश केला आहे.
भौगोलिक स्थान आणि नद्यांचे जाळे
हे उद्यान कांगेर नदीच्या प्रवाहाभोवती विस्तारले आहे. कांगेर नदी ही कोलाब नदीची उपनदी असून, पुढे जाऊन ती गोदावरी नदीला मिळते. या भागात सपाट भूभाग, सौम्य उतार, उंचसखल प्रदेश, खोल दऱ्या, आणि वळणदार प्रवाह यांचा समावेश आहे.
प्रसिद्ध धबधबा - तीरथगढ धबधबा
कांगेर नदीपासून उगम पावणारा तीरथगढ धबधबा हे या उद्यानातील प्रमुख आकर्षण आहे. सुमारे 150 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या या धबधब्याचे दृश्य मनमोहक आहे.
गुहा पर्यटन आणि चुनखडीच्या गुहा
कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यानाला चुनखडीच्या गुहांचे आगार म्हणता येईल. येथे कोटमसर गुहा, कैलाश गुहा आणि दंडक गुहा यांसारख्या 15 हून अधिक सुप्रसिद्ध गुहा आहेत. या गुहा जैवविविधतेसाठी तसेच भौगोलिक अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
वनस्पती आणि जंगलांचे स्वरूप
उद्यानात मिश्र दमट पानगळी वनसंघ आहेत, जिथे प्रामुख्याने सागवान, साल आणि बांबूची झाडे आढळतात.
प्राणीजीवन आणि जैवविविधता
उद्यानात बिबट्या, जंगली मांजर, चितळ, सांबर, भेकर, जंगली डुक्कर, कोल्हा, लंगूर, रिझस माकड, अस्वल, अजगर, तरस, ससा, मगरी आणि सिव्हेट जातीचे प्राणी पाहायला मिळतात.
याशिवाय येथे काही दुर्मीळ प्राणी देखील आढळतात, जसे की –
छत्तीसगडचे राज्य पक्षी – बस्तर हिल मैना
हे राष्ट्रीय उद्यान छत्तीसगडच्या राज्य पक्षी बस्तर हिल मैना साठी देखील प्रसिद्ध आहे.
कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. येथील निसर्गसंपदा, गुहा, धबधबे, वनस्पती आणि प्राणी यामुळे पर्यटक आणि अभ्यासकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.
Subscribe Our Channel