Technology and Innovation Report, 2025
2025 साली संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेने (UNCTAD) प्रकाशित केलेल्या "तंत्रज्ञान आणि नवोन्मेष अहवालानुसार", मध्ये भारताने खाजगी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) गुंतवणुकीत जागतिक स्तरावर 10वे स्थान मिळवले आहे. या अहवालात भारताची वाढती तांत्रिक क्षमता अधोरेखित करण्यात आली आहे तसेच AI, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या सीमारेषावरील तंत्रज्ञानांच्या स्वीकारासाठी विविध देश किती तयार आहेत, याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
अहवालाविषयी माहिती
- Technology and Innovation Report हा अहवाल UNCTAD द्वारे वेळोवेळी प्रसिद्ध केला जातो. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेष (Science, Technology, Innovation STI) या संदर्भातील धोरणविषयक विश्लेषण केले जाते, विशेषतः विकासशील देशांसाठी.
- 2025 थीम: Inclusive Artificial Intelligence for Development सर्वसमावेशक आणि समतोल विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता.
भारताचे स्थान आणि कामगिरी
Frontier Technologies Readiness Index 2024
Frontier Technologies Readiness Index 2024 मध्ये भारताने 170 देशांपैकी 36वे स्थान मिळवले आहे, जे 2022 मधील 48व्या स्थानावरून लक्षणीय सुधारणा दर्शवते.
या निर्देशांकामध्ये खालील घटकांचा विचार केला जातो:
- ICT प्रवेश (भारत 99 वे स्थान)
- कौशल्य विकास (113 वे स्थान)
- संशोधन व विकास (R&D 3रे स्थान)
- औद्योगिक क्षमता (10वे स्थान)
- आर्थिक प्रवेशयोग्यता (70 वे स्थान)
AI क्षेत्रातील भारताची गुंतवणूक
- 2023 मध्ये भारताने खाजगी AI गुंतवणुकीत $1.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून जागतिक स्तरावर 10वे स्थान मिळवले.
- फक्त भारत व चीन हे दोनच विकासशील देश या यादीत आहेत. चीनने $7.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत दुसरे स्थान मिळवले, तर अमेरिका $67 अब्ज डॉलर्ससह अव्वल आहे.
संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील भारत
- GitHub वरील विकसकांच्या सहभागानुसार भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
- भारताचे AI संशोधन उत्पादनदेखील उल्लेखनीय आहे चीन, अमेरिका, जर्मनी, ब्रिटनसारख्या देशांच्या पंक्तीत भारताची गणना होते.
- पेटंट विश्लेषणानुसार भारताची विशेष ओळख नॅनो-तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण झाली आहे.
आव्हाने व संधी
- अहवालानुसार भारत R&D आणि औद्योगिक क्षमतेत आघाडीवर असला तरी ICT प्रवेश, कौशल्य विकास व आर्थिक सहाय्याच्या बाबतीत मागे आहे.
- हे धोरणात्मक दुर्बल मुद्दे असल्यामुळे या क्षेत्रात विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
जागतिक चित्र आणि तंत्रज्ञानातील असमतोल
- केवळ 100 कंपन्या (बहुतेक अमेरिका व चीनमधील) जगभरातील 40% R&D गुंतवणूक करतात.
- 118 देश अजूनही AI नियमावलीच्या जागतिक चर्चांपासून दूर आहेत.
- AI मुळे 40% जागतिक नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे नोकरी गमावण्याचा धोका व उत्पादनक्षमतेत वाढ यामधील संतुलन राखणे गरजेचे ठरते.
धोरणात्मक उपाय आणि भारताची दिशा
UNCTAD ने तिन्ही महत्त्वाच्या घटकांवर भर देण्याचा सल्ला दिला आहे:
- डिजिटल पायाभूत सुविधा
- डेटा उपलब्धता आणि पारदर्शकता
- कौशल्यविकास व डिजिटल साक्षरता
भारत सरकारने 2024 मध्ये सुरू केलेल्या IndiaAI Mission चे विशेष कौतुक या अहवालात करण्यात आले आहे. या अभियानामुळे भारत AI क्षेत्रात अधिक व्यापक आणि समावेशक बनण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे.
निष्कर्ष
Technology and Innovation Report 2025 हा केवळ आकडेवारीवर आधारित दस्तऐवज नाही, तर धोरणकर्त्यांसाठी एक मार्गदर्शकही आहे. भारताची AI व नवोन्मेष क्षेत्रातील प्रगती निश्चितच उत्साहवर्धक आहे. परंतु कौशल्य, आर्थिक सहाय्य व तंत्रज्ञान सुलभतेच्या क्षेत्रात अधिक काम करणे आवश्यक आहे. AI सारख्या शक्तिशाली तंत्रज्ञानाचा उपयोग समतोल, सर्वसमावेशक आणि मानवी विकासासाठी व्हावा, हीच या अहवालाची मुख्य सूचना आहे.
Subscribe Our Channel