वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025
वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025 नुकताच प्रकाशित झाला असून, या अहवालात जगभरातील देशांना त्यांच्या नागरिकांच्या आनंद आणि एकूणच कल्याणावर आधारित क्रमवारी देण्यात आली आहे.
|
वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025 बद्दल
हा वार्षिक जागतिक अहवाल आहे, जो नागरिकांच्या आयुष्याविषयी समाधान (Life Satisfaction) आणि आनंदाच्या पातळीवर (Happiness Level) आधारित विविध देशांचे मूल्यमापन करून त्यांना क्रमवारी देतो.
मूल्यमापन प्रक्रिया आणि तत्त्वे
या अहवालात सांख्यिकीय (Statistical Data) तसेच जनतेच्या दृष्टिकोनावर (Public Perception) आधारित विश्लेषण करून नागरिकांच्या एकूण कल्याणाची (Overall Well-being) स्थिती मोजली जाते.
अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था:
वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या Wellbeing Research Centre तर्फे प्रसिद्ध केला जातो. या संशोधन संस्थेबरोबर खालील आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग आहे
- Gallup (जगभरातील सर्वेक्षण करणारी प्रसिद्ध संस्था)
- UN Sustainable Development Solutions Network (संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित संस्था)
- स्वतंत्र संपादकीय मंडळ (Independent Editorial Board)
क्रमवारी ठरवण्यासाठी वापरण्यात येणारी निकष:
वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टमध्ये खालील सहा प्रमुख घटकांवर आधारित देशांची क्रमवारी ठरवली जाते
- सामाजिक आधार (Social Support) नागरिकांना त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजाकडून मिळणाऱ्या मदतीचे मूल्यांकन.
- प्रति व्यक्ती उत्पन्न (GDP per Capita) देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकांची आर्थिक सुरक्षितता.
- निरोगी आयुर्मान (Healthy Life Expectancy) नागरिकांचे सरासरी आरोग्यदायी आयुष्यमान.
- स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता (Perceived Freedom to Make Life Choices) व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय स्वातंत्र्याने घेता येण्याचा अधिकार.
- दानशीलता (Generosity) नागरिकांची एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, स्वयंसेवा आणि दानधर्म करण्याचा कल.
- लाचलुचपत प्रतिमा (Perception of Corruption) देशातील सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराबद्दल नागरिकांचा विश्वास.
वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025 मधील ठळक मुद्दे
-
टॉप १० आनंदी देश:
- फिनलँड, डेन्मार्क, आईसलँड आणि स्वीडन हे नॉर्डिक देश आघाडीवर.
- कोस्टा रिका (6वे) आणि मेक्सिको (10वे) प्रथमच टॉप १० मध्ये.
- इस्रायल (8वे) हमाससोबत युद्ध सुरू असतानाही उच्च स्थान कायम.
-
आनंदाचे मुख्य घटक:
- केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नाही, विश्वास, सामाजिक संबंध आणि आधार यांना अधिक महत्त्व आहे.
- कौटुंबिक रचना: युरोप आणि मेक्सिकोमध्ये ४-५ सदस्य असलेल्या कुटुंबांमध्ये आनंदाची पातळी सर्वाधिक आहे.
- दयाळूपणा आणि विश्वास: हरवलेले पाकीट परत मिळण्याची शक्यता राष्ट्रीय आनंदाच्या पातळीवर मोठा परिणाम करते.
-
पश्चिमी देशांमध्ये आनंदाची घट:
- अमेरिका (24वे): 2012 मध्ये 11व्या स्थानावरून घसरले, समाजातील एकाकीपणाच्या वाढत्या प्रमाणामुळे.
- ब्रिटन (23वे): 2017 नंतरचा सर्वात कमी आनंद स्तर.
-
सर्वात कमी आनंदी देश:
- अफगाणिस्तान सर्वात कमी आनंदी देश, विशेषतः महिलांसाठी परिस्थिती अत्यंत वाईट.
- सिएरा लिओन आणि लेबनॉन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर.
- जागतिक सामाजिक आधार घटतोय: 19% तरुणांकडे कोणीही आधार देणारे नाहीत.
भारताचे स्थान आणि कामगिरी
- सुधारित रँकिंग: भारताने 126व्या (143 पैकी) वरून 118व्या (147 पैकी) स्थानावर झेप घेतली.
- आनंद पातळी स्कोअर वाढला: 4.054 वरून 4.389 (10 पैकी).
भारतातील मुख्य उप-घटक:
- दान करण्यासाठी 57वे स्थान
- स्वयंसेवेसाठी 10वे स्थान
- परिचित नसलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी 74वे स्थान
- हरवलेले पाकीट परत मिळण्याची शक्यता:
- शेजाऱ्याकडून 115वे स्थान
- अनोळखी व्यक्तीकडून 86वे स्थान
- पोलीसांकडून 93वे स्थान
शेजारी देशांच्या तुलनेत भारताचे स्थान:
- पाकिस्तान (109वे), नेपाळ आणि युक्रेन यांच्यापेक्षा मागे.
भारताच्या क्रमवारीतील विसंगती
-
पाकिस्तानच्या मागे का?
- भारताची अर्थव्यवस्था आणि प्रशासन अधिक चांगले असूनही, सामाजिक आधार, स्वातंत्र्याची भावना आणि समाजातील विश्वास या बाबतीत भारताची कामगिरी तुलनेने कमी आहे.
-
भारत-पाकिस्तान तुलना:
- प्रति व्यक्ती उत्पन्न: भारत ($2,480.8 - 2023), पाकिस्तान ($1,365.3)
- निरोगी आयुर्मान: भारत (58.1 वर्षे), पाकिस्तान (56.9 वर्षे)
- भ्रष्टाचार प्रतिमा निर्देशांक (2024): भारत (96वे), पाकिस्तान (135वे)
निष्कर्ष
भारताच्या आनंद पातळीत सुधारणा झाली असली तरी, क्रमवारी ठरवण्याची पद्धत वादग्रस्त आहे. आर्थिक आणि प्रशासकीय ताकदीचा विचार न करता सामाजिक घटकांना जास्त महत्त्व दिले जाते.
Gallup चे CEO Jon Clifton म्हणतात:
"आनंद केवळ संपत्ती किंवा आर्थिक वाढीवर अवलंबून नसतो; विश्वास, सामाजिक संबंध आणि एकमेकांना आधार देण्याची भावना अधिक महत्त्वाची असते. मजबूत अर्थव्यवस्था आणि समुदाय घडवायचे असतील, तर लोकांनी एकमेकांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे."
Subscribe Our Channel