सात शिखर चॅलेंज (7 Summits Challenge): एक जागतिक साहसिक पराक्रम

Home / Blog / सात शिखर चॅलेंज (7 Summits Challenge): एक जागतिक साहसिक पराक्रम
हैदराबादच्या किशोर वयातील गिर्यारोहक विष्णनाथ कार्तिकेय पदकांती याने एक ऐतिहासिक पराक्रम केला आहे. तो सातही खंडांतील सर्वोच्च शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय, तसेच जगातील दुसरा सर्वात तरुण व्यक्ती ठरला आहे. ही मोहीम ‘Seven Summits Challenge’ म्हणून ओळखली जाते आणि ती जगभरातील गिर्यारोहकांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.
‘Seven Summits Challenge’ ही एक अशी मोहीम आहे ज्यामध्ये जगातील सातही खंडांमध्ये असलेली सर्वात उंच शिखरे सर करायची असतात. ही मोहीम गिर्यारोहणाच्या इतिहासातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या मोहिमांपैकी एक मानली जाते.
सातही खंडांतील सर्वाधिक उंच शिखरे सर करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही शिखरे खालीलप्रमाणे आहेत:
‘Seven Summits’ चा संकल्पना आणि पहिली अंमलबजावणी 1985 साली अमेरिकन गिर्यारोहक रिचर्ड बास यांनी केली होती. त्यांनी सर्वप्रथम सातही खंडांतील सर्वोच्च शिखरे सर केली आणि ही मोहीम जगभर प्रसिध्द झाली.
सात शिखर चॅलेंज पूर्ण करण्यासाठी दोन भिन्न पद्धती आहेत:
सात शिखर चॅलेंज ही केवळ एक गिर्यारोहण मोहीम नाही, तर ती साहस, दृढ निश्चय, मानसिक आणि शारीरिक क्षमतेची परिसीमा दाखवणारा जागतिक स्तरावरील पराक्रम आहे. विष्णनाथ कार्तिकेय यांची ही कामगिरी भारतातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे आणि भविष्यातील साहसप्रेमींसाठी एक नवे ध्येयस्थळ ठरते.
Subscribe Our Channel