Home / Blog / सीन नदी पॅरिस
पॅरिसमध्ये शंभर वर्षांनंतर सीन नदी सार्वजनिक जलतरणासाठी पुन्हा खुली करण्यात आली.
सीन नदी
- सीन नदी ही उत्तर फ्रान्समधील ७७७ किमी लांब नदी आहे.
- जलप्रवाह क्षेत्र (drainage basin): या नदीचे जलप्रवाह क्षेत्र पॅरिस बेसिनमध्ये आहे, जे उत्तर फ्रान्समधील बहुतेक भाग व्यापते.
- उगम (Origin): सीन नदीचा उगम Source-Seine येथे होतो, जे डिजॉनच्या वायव्येस ३० किमी अंतरावर आहे. हा भाग लाँग्रे पठार (Langres Plateau) मध्ये आहे.
- ही नदी पॅरिस शहरातून वाहते आणि ले आव्ह्रे (Le Havre) (तसेच डाव्या किनाऱ्यावर हॉन्फ्लर) येथे इंग्लिश खाडीमध्ये (English Channel) मिळते.
- ही नदी ल्वार नदीनंतर (Loire River) फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब नदी आहे.
- महत्त्वाच्या उपनद्या (Important tributaries): मार्न (Marne), यॉन (Yonne), ओईज (Oise), आणि ओब (Aube) या आहेत.
- सांस्कृतिक महत्त्व: युनेस्कोने सीन नदीचे दोन्ही किनारे – रिव गॉश (Rive Gauche) आणि रिव द्रोईट (Rive Droite) – यांना युरोपमधील जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
Subscribe Our Channel