Home / Blog / ग्लोबल वेटलँड आउटलुक 2025
ग्लोबल वेटलँड आउटलुक 2025
ग्लोबल वेटलँड आउटलुक 2025 अहवालानुसार, दलदलीचे नष्ट होण्याचे प्रमाण जगातील इतर कोणत्याही नैसर्गिक प्रणालींपेक्षा अधिक वेगाने आहे.
अहवालाविषयी
- हा अहवाल रामसर कन्व्हेन्शन (Convention on Wetlands) या आंतरराष्ट्रीय कराराचा प्रमुख दस्तऐवज आहे, जो या कराराच्या Scientific and Technical Review Panel (STRP) ने तयार केला आहे. या मालिकेचा पहिला अहवाल 2018 मध्ये प्रसिद्ध झाला होता.
- हा अहवाल जगभरातील दलदलींच्या व्याप्ती, स्थिती आणि प्रवृत्ती याविषयी सर्वाधिक अद्ययावत व सविस्तर माहिती देतो. त्यात दलदलींचे आर्थिक व सामाजिक मूल्य, तसेच त्यांच्या संवर्धन, पुनर्बहाली व शाश्वत वित्तपुरवठ्याच्या उपाययोजनांवर भर दिला आहे.
- हा अहवाल COP15 परिषद (23 ते 31 जुलै 2025, व्हिक्टोरिया फॉल्स, झिंबाब्वे) च्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ग्लोबल वेटलँड आउटलुक 2025: मुख्य मुद्दे
- आफ्रिकेतील दलदली जगातील सर्वात जास्त नष्ट झालेल्या परिसंस्था आहेत.
- 1970 पासून सुमारे 22% दलदली नष्ट झाल्या असून, तातडीने उपाययोजना न केल्यास 2050 पर्यंत उर्वरित दलदलींपैकी आणखी एक-पंचमांश भाग धोक्यात येऊ शकतो.
- जागतिक पातळीवर दलदली फक्त 6% भूभाग व्यापतात, मात्र त्या जागतिक GDP च्या 7.5% पेक्षा अधिक मूल्याच्या परिसंस्थात्मक सेवा पुरवतात — अंदाजे $39 ट्रिलियन डॉलर वार्षिक.
- यामध्ये पाण्याचे शुद्धीकरण, कार्बन संचयन, किनारी भागांचे संरक्षण, अन्न प्रणाली व उपजिविकेला आधार यांचा समावेश आहे.
- दरवर्षी 0.52% दराने दलदली नष्ट होत आहेत.
- प्रमुख कारणे: शहरीकरण आणि औद्योगिक विकास.
अभ्यासप्रकरणे
- झांबियातील काफू फ्लॅट्स (Kafue Flats): येथे $3 लाखांच्या सुरुवातीच्या पुनर्बहाली उपक्रमाचा विस्तार होत जाऊन आज $10 लाख वार्षिक गुंतवणूक केली जाते, जी 30 लाख लोकांवर आधारित परिसंस्था आणि जैवविविधता टिकवते.
- Regional Flyway Initiative (आशियातील उपक्रम): $3 अब्ज गुंतवणुकीचा उपक्रम, जो 140 पेक्षा अधिक स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाच्या दलदली आणि जवळपास 200 दशलक्ष लोकसंख्या लाभार्थी असलेल्या परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करतो.
दलदलीचे नुकसान थांबवण्यासाठी अहवालात सूचवलेले ४ उपायमार्ग
- निर्णय प्रक्रियेत दलदलींचे मूल्य समाविष्ट करणे — दलदलींना भूमी वापर, पाणी व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजनात आवश्यक पायाभूत सुविधा म्हणून स्वीकारणे.
- दलदलींचे जागतिक जलचक्रातील महत्त्व ओळखणे — जलसंचयन, शुद्धीकरण व नियमनाच्या भूमिकेसह.
- नवोन्मेषी वित्तीय यंत्रणांमध्ये दलदली समाविष्ट करणे — कार्बन मार्केट्स, रेसिलियन्स बाँड्स, आणि ब्लेंडेड फायनान्स यांचा वापर.
- सार्वजनिक व खाजगी वित्तीय स्रोत सक्रिय करणे — स्थानिक समुदायांना आधार देणाऱ्या जमीनीवरील कृतीसाठी भागीदारीद्वारे निधी उपलब्ध करून देणे.
Subscribe Our Channel