मायटोकोंड्रियल डोनेशन उपचार (Mitochondrial Donation Treatment - MDT)
युनायटेड किंगडममध्ये किमान आठ बाळांचा जन्म अशा पद्धतीने झाला आहे की ज्यामध्ये तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या DNA चा उपयोग करण्यात आला आहे. ही एक क्रांतिकारी प्रजनन उपचार पद्धत आहे, जी अनुवंशिक आजार पिढीपरंपरेने पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी वापरली जाते.
मायटोकोंड्रियल डोनेशन उपचार म्हणजे काय?
(स्रोत: The Guardian)
- ही IVF (In-Vitro Fertilisation) ची एक विशेष प्रक्रिया आहे, ज्यात आईच्या अंड्यातील दोषपूर्ण मायटोकोंड्रियल DNA काढून त्याऐवजी एक दात्याकडून प्राप्त निरोगी मायटोकोंड्रियल DNA टाकले जाते.
- यामुळे गंभीर आणि जीवघेण्या अनुवंशिक आजारांपासून बाळाला वाचवणे शक्य होते.
ही प्रक्रिया कशी काम करते?
- मायटोकोंड्रिया हे पेशींमधील लहान संरचना आहेत, ज्या पेशींना ऊर्जा पुरवतात.
- जर मायटोकोंड्रिया नीट कार्य करत नसतील, तर त्याचा परिणाम मेंदू, स्नायू, हृदय आणि इतर अवयवांवर होऊ शकतो.
- MDT प्रक्रियेत, स्त्रीच्या अंड्यातील दोषयुक्त मायटोकोंड्रिया काढून त्याऐवजी निरोगी मायटोकोंड्रिया दात्याकडून घेऊन रोवले जातात.
- मात्र, बाळाचे मुख्य जनुक DNA (nuclear DNA) आईचाच असतो.
- परिणामी, बाळाचे DNA तीन व्यक्तींकडून येते: आई, वडील आणि डाता.
- तथापि, दात्याचे योगदान बाळाच्या संपूर्ण जनुकीय रचनेपैकी 1% पेक्षा कमी असते.
महत्त्वाची नोंद:
यूके हे 2015 मध्ये मायटोकोंड्रियल डोनेशन वापरास मान्यता देणारे जगातील पहिले देश ठरले.
Subscribe Our Channel