आर्बोव्हायरल रोग (Arboviral Diseases)
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलीकडेच आर्बोव्हायरल रोगांच्या व्यवस्थापनासाठी पहिले एकात्मिक मार्गदर्शक तत्त्व (integrated guidelines) जाहीर केले आहेत.
आर्बोव्हायरल रोग म्हणजे काय?
- आर्बोव्हायरल (Arboviral) रोग हे "अर्थ्रोपॉड-बोर्न व्हायरस" (arthropod-borne viruses) मुळे होणारे संसर्गजन्य आजार आहेत. हे आजार संक्रमित डास किंवा किटक चावल्यामुळे मानवांमध्ये पसरतात.
- हे प्रामुख्याने एडीस डासांमुळे (Aedes mosquitoes) पसरतात.
प्रसार करणारे मुख्य डास
- Aedes aegypti या डासामुळे एकाच भौगोलिक भागात एकाच वेळी अनेक विषाणू पसरू शकतात.
उदाहरणे
- वेस्ट नाईल (West Nile)
- झिका (Zika)
- चिकनगुनिया (Chikungunya)
- डेंग्यू (Dengue)
- ईस्टर्न इक्वाइन इन्सेफलायटीस (Eastern equine encephalitis)
इतर प्रसाराचे मार्ग
- काही विषाणू रक्तदान, अंग प्रत्यारोपण, लैंगिक संबंध, किंवा आईकडून बाळाकडे संक्रमित होऊ शकतात.
लक्षणे (Symptoms)
डास किंवा किटक चावल्यानंतर काही दिवसांपासून दोन आठवड्यांपर्यंत लक्षणे दिसून येतातः
- ताप
- अतिसार आणि उलटी
- अंगदुखी
- त्वचेवर पुरळ
- रक्तस्राव (डेंग्यू व यलो फिवरमध्ये)
- डोकेदुखी
- मान अडकणे
- अती झोप येणे
- झटके येणे
- बेशुद्ध होणे
प्रतिबंध (Prevention)
- कीटकनाशक स्प्रे आणि insect repellents वापरणे
- संपूर्ण अंग झाकणारे कपडे वापरणे
- घरात आणि सभोवताली पाणी साचू न देणे (डासांची पैदास होऊ नये म्हणून)
- खिडक्या व दरवाज्यांच्या जाळ्या (screens) नीट असल्याची खात्री करणे
जागतिक धोका आणि परिणाम (Global Risk & Impact)
- सध्या ५.६ अब्ज लोक आर्बोव्हायरल आजारांच्या जोखमीखाली आहेत.
- हे आजार प्रामुख्याने उष्णकटिबंधीय व उप-उष्णकटिबंधीय भागांमध्ये स्थानिक (endemic) आहेत.
- आता हे आजार जगभर झपाट्याने पसरत आहेत.
- अनेक वेळा समान फ्लू-प्रमाणे लक्षणे असल्यामुळे निदान कठीण होते.
- काही भागांमध्ये एकाच वेळी अनेक आर्बोव्हायरसचे संक्रमण आढळते.
Subscribe Our Channel