संदर्भ:
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) 2025 मध्ये भारतातील सर्वात प्रबळ डार्कनेट ड्रग सिंडिकेट उद्ध्वस्त करून "ऑपरेशन मेलोन" अंतर्गत मोठे यश मिळवले आहे.
ऑपरेशन MELON बद्दल:
- हे ऑपरेशन NCB च्या कोचीन झोनल युनिटने केले.
- यामध्ये “केटामेलन” (Ketamelon) नावाचे भारतातील सर्वात विकसित डार्कनेट ड्रग सिंडिकेट उद्ध्वस्त करण्यात आले.
- केटामेलन हे गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय असलेले भारताचे एकमेव ‘लेव्हल 4’ डार्कनेट व्हेंडर होते.
केटामेलनचे नेटवर्क:
- हे सिंडिकेट एलएसडी (Lysergic Acid Diethylamide) नावाचे ड्रग बंगळुरू, चेन्नई, भोपाळ, पाटणा, दिल्ली, तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागांमध्ये पुरवत होते.
- यासाठी त्यांनी अत्याधुनिक डार्कनेट प्लॅटफॉर्म्स व लॉजिस्टिक नेटवर्क उभारले होते.
LSD म्हणजे काय?
- LSD (Lysergic Acid Diethylamide) ला ‘अॅसिड’, ‘ब्लॉट्स’, किंवा ‘स्टॅम्प्स’ असेही म्हणतात.
- हे एक भासात्मक (hallucinogenic) ड्रग आहे.
- वासरहित, रंगहीन व चवहीन असून, हे छोट्या कागदावर लावून त्याचा चाटून किंवा गिळून वापर केला जातो.
पूर्वीचा झांबाडा कार्टेल (Zambada):
- 2023 मध्ये NCB ने ‘झांबाडा’ नावाचे देशातील सर्वात मोठे डार्कनेट एलएसडी कार्टेल उध्वस्त केले होते.
- हे दिल्ली एनसीआर क्षेत्रातून कार्यरत होते आणि 5-स्टार रेटिंग असलेले एकमेव कार्टेल होते.
डार्कनेट कार्टेल रेटिंग प्रणाली:
- 1 ते 5 स्तरांमध्ये डार्कनेटवरील कार्टेलना ड्रगची गुणवत्ता (potency) व कस्टमर सर्व्हिस या निकषांवर रेटिंग दिले जाते.
- ‘लेव्हल 4’ व ‘लेव्हल 5’ हे अत्यंत प्रभावशाली व धोकादायक गट मानले जातात.
Subscribe Our Channel