राज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून चार नामवंत व्यक्तींची नियुक्ती
भारत सरकारने अलीकडेच चार नामांकित व्यक्तींना राज्यसभेत नियुक्त केले आहे. यात माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, सी. सदानंदन मास्टर, आणि इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे.
राज्यसभेतील राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले सदस्य: घटनात्मक तरतुदी
कलम ८० – राज्यसभेची रचना:
- एकूण सदस्यसंख्या:
राज्यसभा ही दोनशे अठ्ठेचाळीस (238) सदस्यांपासून बनलेली असते, यामध्ये
- राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात.
- १२ सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात.
कलम ८० (३) – नामनिर्देशित सदस्यांसाठी पात्रता:
राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले सदस्य हे साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेले असावे.
नामनिर्देशित सदस्यांचे अधिकार आणि विशेषाधिकार:
- राजकीय पक्षात प्रवेश: नामनिर्देशित सदस्यांना त्यांच्या जागेवर विराजमान झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कोणत्याही राजकीय पक्षात सामील होण्याचा अधिकार आहे.
- सर्वसाधारण अधिकार:ते सर्वसाधारण संसद सदस्यांप्रमाणेच अधिकार व विशेषाधिकार उपभोगू शकतात आणि सभागृहातील कारवाईत सहभागी होऊ शकतात.
- मताधिकार:
- राष्ट्रपती निवडणुकीत मत देण्याचा अधिकार नाही.
- परंतु उपराष्ट्रपती निवडणुकीत ते मतदान करू शकतात.
Subscribe Our Channel