ब्लू NDC चॅलेंज : महासागर-केंद्रित हवामान कृतीसाठी ब्राझील आणि फ्रान्सचा पुढाकार
संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेत (UNOC) ९ जून २०२५ रोजी ब्राझील आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे ब्लू नॅशनल डिटरमाइन्ड कॉन्ट्रिब्युशन्स (Blue NDC) चॅलेंज या जागतिक उपक्रमाची घोषणा केली.
ब्लू NDC चॅलेंज बाबत माहिती
- हा उपक्रम महासागराला राष्ट्रीय हवामान धोरणांच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे.
- हा उपक्रम Ocean Breakthroughs आणि Marrakech Partnership शी सुसंगत आहे.
उद्दिष्ट
- राष्ट्रीय स्तरावरील हवामान कृती योजनांमध्ये (NDCs) महासागराधारित शमन (mitigation) आणि अनुकूलन (adaptation) उपायांचा समावेश करणे.
संस्थात्मक सहकार्य व भागीदार संस्था
- Ocean Conservancy
- World Resources Institute (WRI)
- Ocean & Climate Platform
- Ocean Resilience and Climate Alliance (ORCA)
- NDC Partnership
स्थापनकर्ते देश
प्रारंभिक सहभागी ८ देश
- ऑस्ट्रेलिया, फिजी, केनिया, मेक्सिको, पालाऊ, सेशेल्स, ब्राझील, फ्रान्स
उद्दिष्टे
- पॅरिस कराराच्या अंतर्गत अद्ययावत NDCs मध्ये महासागराधारित उपायांचा समावेश
- महासागरांच्या हवामान नियंत्रक भूमिकेला अधोरेखित करणे
- २०५० पर्यंत लवचिक, नेट-शून्य उत्सर्जन आणि निसर्ग-सकारात्मक विकासाला पाठबळ देणे
- महासागर आणि हवामान उपायांसाठी जागतिक सहकार्य आणि महत्वाकांक्षा बळकट करणे
महासागराधारित हवामान कृतीची प्रमुख क्षेत्रे
- सागरी परिसंस्था पुनर्संचयन आणि संरक्षण: मॅन्ग्रोव्हज, कोरल रीफ्स, समुद्री गवत यांचे संरक्षण व पुनर्संचयन Marine Protected Areas चा विस्तार
- सागरी स्थानिक नियोजन आणि किनारपट्टी व्यवस्थापन हवामान-स्मार्ट आणि समाकलित नियोजनाद्वारे शाश्वत विकास.
- स्वच्छ महासागर ऊर्जा: ऑफशोर वारा, लाट आणि भरतीच्या ऊर्जेचा विकास समुद्रातील तेल व वायू उत्खननावर टप्प्याटप्प्याने निर्बंध.
- हवामान-लवचिक मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन शाश्वतता आणि अन्न सुरक्षेसाठी अनुकूलन उपायांची अंमलबजावणी.
- सागरी क्षेत्रांचे डीकार्बनायझेशन शिपिंग आणि सीफूड उद्योगांमधील कार्बन उत्सर्जनात कपात.
निष्कर्ष
ब्लू NDC चॅलेंज उपक्रम जागतिक हवामान कृतीमध्ये महासागराला महत्त्वाचे स्थान देणारा उपक्रम आहे. यामुळे जैवविविधता रक्षण, स्वच्छ ऊर्जा प्रोत्साहन, हवामान-लवचिक अर्थव्यवस्था निर्माण आणि महासागर-केंद्रित धोरणनिर्मितीस चालना मिळेल.
Subscribe Our Channel