भारतीय कलांचा इतिहास : परंपरा, शैली आणि वारसा

Home / Blog / भारतीय कलांचा इतिहास : परंपरा, शैली आणि वारसा
आज या लेखात आपण भारतीय कलांच्या समृद्ध इतिहासाची MPSC/UPSC परीक्षेसाठी महत्वाची असणारी सविस्तर माहिती पाहणार आहोत. भारत ही एक अशी भूमी आहे जिथे प्राचीन काळापासून कला ही जीवनाचा अविभाज्य भाग राहिली आहे. या लेखात आपण दृश्यकला (चित्रकला, शिल्पकला), ललित कला (संगीत, नृत्य, नाट्य) आणि उपयोजित कलांच्या परंपरा, शैली आणि व्यवसायिक संधींवर चर्चा करणार आहोत. ही सर्व माहिती प्राचीन ग्रंथ, पुरातत्त्वीय पुरावे आणि ऐतिहासिक संदर्भांवर आधारित आहे. चला तर मग,या कलानगरीमध्ये आपण आता प्रवेश करूया!
भारतीय कलांचा इतिहास : परंपरा, शैली आणि वारसा : एक संक्षिप्त झलक
खालील तक्त्यामध्ये भारतीय कलांचा इतिहास : परंपरा, शैली आणि वारसा या लेखाची एक संक्षिप्त झलक आपल्याला पाहावयास मिळेल:
भारतीय कलांचा इतिहास म्हणजे हजारो वर्षांचा प्रवास आहे, ज्यामध्ये मानवाच्या जीवनशैलीपासून ते धर्म-तत्त्वज्ञानापर्यंत सर्व पैलू कला माध्यमातून व्यक्त झालेले दिसून येतात. सिंधु संस्कृतीतील शिल्पकला, गुप्तकाळातील मंदिरांची नक्षीकामे, मुघल दरबारातील सूक्ष्मचित्रे, लोककलेतील रंगीबेरंगी अभिव्यक्ती आणि आधुनिक चित्रकारांचे अद्वितीय प्रयोग या सर्वांमुळे भारतीय कला जगभरात अद्वितीय ठरली आहे.
भारतीय कला केवळ सौंदर्यदृष्टीची अभिव्यक्ती नाही, तर ती सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तवाचे प्रतिबिंब आहे. म्हणूनच भारतीय कलांचा इतिहास म्हणजे परंपरा, शैली आणि वारशाचा अखंड संगम आहे.
भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून बहुपेडी राहिली आहे. प्रत्येक कालखंडात कलेने धार्मिक श्रद्धा, सामाजिक मूल्ये आणि दैनंदिन जीवनाला अधोरेखित केले आहे. वेदकाळातील यज्ञविधी, बौद्धकालीन भित्तिचित्रे, मध्ययुगीन राजस्थानी शैली, मुघलकालीन दरबारी चित्रकला हे सारे कलात्मक प्रवाह भारतीय संस्कृतीच्या विविधतेचे द्योतक आहेत.
भारतीय संस्कृतीत कला ही केवळ अलंकरणाची साधन नाही, तर आत्मिक उन्नतीचे साधन मानले गेले आहे. "सत्यं, शिवं, सुंदरं" या भारतीय तत्त्वज्ञानाच्या मूळामध्ये कला सामावलेली आहे.
भारतीय कलांचा आरंभ प्राचीन सिंधु संस्कृतीपासून होतो. हडप्पा व मोहनजोदाडो येथील उत्खननात सापडलेले पाषाणमूर्ती, टेराकोटा मूर्ती, शिक्के आणि चित्रलिपी यावरून तेथील लोक कलेला महत्त्व देत असत हे दिसून येते.
"नर्तकीची कांस्यप्रतिमा" ही भारतीय कलेतील पहिली उत्कृष्ट निर्मिती मानली जाते.
प्राण्यांच्या आकृती असलेले शिक्के व्यापारी आणि धार्मिक जीवनाशी निगडित होते.
मातीच्या खेळण्यांमध्ये त्या काळातील लोकजीवनाचे प्रतिबिंब दिसते.
ही कला साधी असूनही जीवनातील वास्तवाचे दर्शन घडवते. त्यामुळे भारतीय कलांचा पाया सिंधु संस्कृतीत घातला गेला असे आपल्याला म्हणता येईल.
वैदिक काळात कला धार्मिक विधींशी निगडित होती. यज्ञकुंडांची रचना, मंडपातील अलंकार, तसेच वेदांमध्ये उल्लेखलेले संगीत व नृत्यकला हे या काळातील महत्त्वाचे घटक आहेत.
सामवेदामधील संगीत परंपरा ही भारतीय शास्त्रीय संगीताची पायाभरणी मानली जाते.
यज्ञमंडपातील सजावट आणि वेदींचे अलंकरण यामुळे धार्मिक कला अधिक प्रभावी झाली.
वैदिक कला ही भौतिक अलंकारांपेक्षा अध्यात्मिक साधनेसाठी वापरली जात होती.
मौर्यकाल हा भारतीय शिल्पकलेच्या दृष्टीने सुवर्णयुग मानला जातो.
अशोक स्तंभ : त्यावरील सिंहमुख हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे.
शिलालेख : धर्मप्रसारासाठी वापरलेली कला.
पाटलीपुत्र आणि सारनाथ येथील स्तूप हे या काळातील महत्त्वाचे स्थापत्य नमुने आहेत.
मौर्य शिल्पकला ग्रीक प्रभावाखाली आली होती, तरी तिची भारतीय वैशिष्ट्ये जपली गेली.
गुप्तकाल हा भारतीय कलेचा सुवर्णकाळ मानला जातो.
मूर्तीशिल्प : बुद्ध, विष्णू, शिव यांच्या मूर्तींच्या रचनांमध्ये सौंदर्य आणि भावनात्मकता दिसते.
मंदिर वास्तुशैली : नागर शैलीतील मंदिरे विकसित झाली.
चित्रकला : अजंठा लेण्यांतील गुप्तकालीन भित्तिचित्रे ही जागतिक वारसा ठरली आहेत.
या काळातील कला साधेपणा, सौंदर्य आणि आध्यात्मिकतेसाठी ओळखली जाते.
भारतीय कलांचा अभिमान म्हणजे अजंठा व एलोरा येथील प्रसिद्ध लेणी.
अजंठा लेण्यांमधील भित्तिचित्रांमध्ये बुद्धाच्या जीवनकथा, जातककथा रेखाटलेल्या आहेत.
एलोरा येथील कैलास मंदिर हे दगडात कोरलेले अद्वितीय स्थापत्य आहे.
येथे हिंदू, बौद्ध व जैन धर्माचा संगम दिसतो.
अजंठा-एलोरा लेणी आजही जगभरातील कला-प्रेमींना आकर्षित करतात.
प्राचीन काळ: गुहेतील कला आणि मूर्तिकला/Ancient Times: Cave Art and Sculpture
भारतीय कलेची सुरुवात प्रागैतिहासिक काळापासून होते. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील गुहेतील चित्रे ही याचे उत्तम उदाहरण आहेत. ही चित्रे शिकार, नृत्य आणि रोजच्या जीवनाचे चित्रण करतात. त्यानंतर, सिंधू संस्कृतीच्या काळात कला अधिक विकसित झाली. मोहेंजोदारोमधील नृत्यांगनेची कांस्यमूर्ती आणि हडप्पा येथील मातीच्या भांड्यांवरची नक्षीकाम ही तत्कालीन कलाकारांच्या कौशल्याची साक्ष देतात.
मौर्य आणि गुप्त साम्राज्यांच्या काळात कलेला राजाश्रय मिळाला. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चार सिंहांची भव्य मूर्ती ही मौर्यकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. गुप्तकाळ हा भारतीय कलेचा सुवर्णकाळ मानला जातो. याच काळात, अजिंठा आणि वेरूळ येथील गुंफाचित्रे आणि शिल्पे साकारली गेली. अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपाणीचे चित्र हे जगातील सर्वात सुंदर कलाकृतींपैकी एक मानले जाते.
मध्ययुगीन काळ: मंदिरांची निर्मिती आणि लघुचित्रे/Medieval Period: Creation of Temples and Miniatures
मध्ययुगात भारतीय कलेचा केंद्रबिंदू धार्मिक इमारती आणि मंदिरे बनले. खजुराहो,कोणार्क येथील मंदिरे त्यांच्यावरील अप्रतिम कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहेत. या मंदिरांवरील शिल्पे केवळ धार्मिक कथाच नव्हे, तर त्या काळातील सामाजिक जीवन आणि मानवी भावनांचेही उत्कृष्ट दर्शन घडवतात.
याच काळात, मुघल साम्राज्याने लघुचित्रकलेला (Miniature Painting) प्रोत्साहन दिले. पर्शियन आणि भारतीय शैलींचा संगम साधून तयार झालेली ही चित्रे अतिशय नाजूक आणि बारीक कामासाठी ओळखली जातात. रामायण, महाभारत आणि इतर ऐतिहासिक घटनांचे चित्रण या लघुचित्रांमध्ये आढळते.
आधुनिक काळ आणि समकालीन कला/Modern Times and Contemporary Art
19 व्या शतकात युरोपियन शैलींचा प्रभाव भारतीय कलेवर पडायला लागला. राजा रवी वर्मा यांनी भारतीय पौराणिक कथांना युरोपियन तंत्रज्ञानाचा वापर करून कॅनव्हासवर उतरवले. त्यांनी भारतीय कलेला एक नवी दिशा दिली.
20 व्या शतकात बंगाल स्कूलने (Bengal School) भारतीय कलेची पारंपरिक ओळख जपण्याचा प्रयत्न केला. अवनींद्रनाथ टागोर आणि नंदलाल बोस यांसारख्या कलाकारांनी भारतीय कलेच्या मूळ शैलीला पुनरुज्जीवित केले. स्वातंत्र्यानंतर, एम.एफ.हुसेन,एस.एच.रझा आणि अमृता शेरगिल यांसारख्या आधुनिक कलाकारांनी भारतीय कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांनी पारंपरिक विषय आणि आधुनिक शैली यांचा अनोखा संगम साधला.
आज भारतीय कला ही केवळ जुन्या परंपरांपुरती मर्यादित नाही. ती सतत बदलत आहे आणि नव्या प्रवाहांचा स्वीकार करत आहे. ग्राफिक आर्ट, डिजिटल कला आणि इंस्टॉलेशन आर्ट अशा अनेक माध्यमांतून आजचे कलाकार आपले विचार व्यक्त करत आहेत.
भारतीय कलेचा हा वारसा आपल्याला आपल्या मुळांची आणि समृद्ध संस्कृतीची ओळख करून देतो. ही केवळ चित्रे किंवा शिल्पे नसून, ती आपल्या पूर्वजांनी पाहिलेली स्वप्नं आणि व्यक्त केलेले विचार आहेत.
दृश्यकलांमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. चित्रकला ही द्विमितीय असते, ज्यात निसर्गचित्र, व्यक्तिचित्र इत्यादी रेखाटले जातात. माध्यमे म्हणजे भिंती, कागद, कापड किंवा मातीची भांडी. अजिंठा लेण्यातील बोधिसत्त्व पद्मपाणी हे भित्तिचित्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
लोकचित्रकला ही अश्मयुगीन गुहाचित्रांपासून सुरू झाली. भारतात मध्य प्रदेशातील भीमबेटका गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत, जी जागतिक वारसा स्थळ आहे. या चित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि भौमितिक आकृत्या दिसतात, ज्यातून तत्कालीन ज्ञान आणि तंत्रज्ञानाची कल्पना येते.
महाराष्ट्रातील वारली चित्रपरंपरा आणि चित्रकथी ही लोककला शैलीची उदाहरणे आहेत. जिव्या सोम्या मशे यांनी वारली चित्रकला लोकप्रिय केली, ज्यासाठी त्यांना पद्मश्री मिळाला. चित्रकथीमध्ये रामायण-महाभारताच्या कथा 30-50 चित्रांद्वारे सांगितल्या जातात.
अभिजात चित्रकला प्राचीन वाङ्मयात 'आलेख्य विद्या' म्हणून उल्लेखित आहे. तिची षडांगे: रूपभेद, प्रमाण, भाव, लावण्ययोजन, सादृश्यता आणि वर्णिकाभंग. हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर पर्शियन, दख्खनी आणि मुघल शैलीचा प्रभाव दिसतो. युरोपीय शैली ब्रिटिश काळात आली, ज्यात जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे योगदान आहे.
शिल्पकला ही त्रिमितीय असते, ज्यात मूर्ती, पुतळे घडवले जातात. वेरूळचे कैलास लेणे आणि अशोकस्तंभ ही याची उदाहरणे आहेत.
लोकशिल्पकला हडप्पा काळापासून आहे, ज्यात गणेशमूर्ती, वीरगळ इत्यादींचा समावेश केला जातो. अभिजात शिल्पकला मौर्य काळातील स्तंभांपासून सुरू झाली. सांची,भारहूत आणि बोरोबुदुर स्तूप हे यासाठी प्रसिद्ध आहेत.
भारतीय मूर्तिविज्ञान गांधार,मथुरा शैलीतून विकसित झाले आहे. चोळ काळातील कांस्यमूर्ती (नटराज) प्रसिद्ध आहेत. येथे स्थापत्य आणि शिल्पकला लेण्यांमध्ये एकत्र दिसते, जसे की अजिंठा-वेरूळ लेण्या. मंदिर शैली: नागर, द्राविड, वेसर, भूमिज. हेमाडपंती मंदिरे (अंबरनाथ, गोंदेश्वर) ही महाराष्ट्राची वैशिष्ट्ये आहेत.
मुस्लीम स्थापत्यामध्ये कुतुबमिनार (73 मीटर), ताजमहाल आणि गोलघुमट ही वारसा स्थळे आहेत. ब्रिटिश काळातील इंडो-गोथिक शैली, जसे की छत्रपती शिवाजी टर्मिनस.
अभ्यासविरांनो तुम्हाला हे ठाऊक आहे का…? ![]() इसवी सनाच्या बाराव्या शतकातील चालुक्य राजा सोमेश्वर यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये – 'मानसोल्लास' किंवा 'अभिलषितार्थचिंतामणी' – चित्रकथी परंपरेचे सविस्तर वर्णन आढळते.या ग्रंथांमुळे आपल्याला भारतीय चित्रकथी परंपरेच्या प्राचीनतेची कल्पना येते.चित्रकथी ही परंपरा कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण, महाभारतातील कथा सांगणे या स्वरूपात प्रचलित होती. या चित्रांमध्ये कागदावर नैसर्गिक रंग वापरून कथांचे सजीव रूप सादर केले जात असे. एका कथेसाठी साधारण 30 ते 50 चित्रांचा वापर केला जात असे. वेगवेगळ्या कथांसाठी अशा चित्रांचे पोथी स्वरूपातील संच पिढ्यान्पिढ्या जपले गेले आहेत.आजही या प्राचीन परंपरेचे महत्व अधोरेखित केले जात आहे आणि सरकार व कलाकारांच्या प्रयत्नांद्वारे या चित्रकथी परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्य सुरू आहे.
|
भारतातील ललित/आंगिक कला परंपरा/Fine/Visual Art Traditions in India
मुघल शैली/Mughal style
कला,उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी/Arts,Applied Arts and Business Opportunities
कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे, ज्यामध्ये संशोधन, पत्रकारिता, कलावस्तू मूल्यमापन, सांस्कृतिक पर्यटन (संग्रहालय, पुरातत्त्व) या संधी आहेत.
उपयोजित कला ही उपयुक्तता आणि कलेची सांगड आहे. क्षेत्रे: औद्योगिक डिझाइन, जाहिरात, घरसजावट, प्रकाशन, स्थापत्य, छायाचित्रण, दागिने, वस्त्र संस्था जसे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन.
Subscribe Our Channel